श्रीरामपुर प्रतिनिधी / जितू शिंदे : श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा या मागणीसाठी श्रीरामपूर शहरातील हनुमान मंदिर येथे घंटानाद आंदोलन सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या वतीने काल दिनांक 27 जून रोजी करण्यात आले.यावेळी श्रीरामपूर शहरातील नागरिक ,पत्रकार, उद्योजक ,व्यवसायिक यांनी देखील घंटानांद आंदोलनाला भेट दिली.दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देत वेरूळ येथील मौनगिरीजी महाराज जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती महामंडलेश्वर, श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा अशी मागणी केली.
प्रभू श्रीरामांच्या नावाने वसलेल्या या श्रीरामपूरला जिल्हा घोषित करावे असे महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज म्हणाले.शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सरकारने मंजूर केल्यामुळे श्रीरामपूर येथील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, राजकीय कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अपर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूरलाच करावे अशी या सर्वांची मागणी आहे.
Leave a reply