प्रतिनिधी / शेख युनूस : राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी वारी निमित्त शालेय चिमुकल्याणी पंढरपूर दिंडीचे आयोजन करत चिखलठाण गावातून टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरिचा वीणा, माऊली निघाली पंढरपूरा, मुखाने म्हणा असा स्वरामुळे चिखलठाण परिषरात अवतरी होती पंढरी.
चिखलठाण जिल्हा परिषद प्राथमिक सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शालेय विद्यार्थी यांनी आषाढी वारी निमित्त आपण आपल्याच गावात शालेय परिसरात आषाढी दिंडी वारी काढण्याचे ठरवले आणि शाळेतील सर्व विद्यार्थी वर्गाने सहभाग नोंदवत विठ्ठल नामाचा, जयघोष करत,चिखलठाण परिसर भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळ्याचे आयोजन करत विठ्ठल रुक्माई ची वेशभूषा साकारली.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या रंगलेली पावली सोहळ्याचे आकर्षण ठरले, हा रिंगण सोहळा पाहत असताना जणू काही पंढरी चिखलठाण मध्ये अवतरली काय असे वाटत होते. शेवटी शालेय विद्यार्थी यांनी माऊली माऊली असा जयघोष करत दिंडीची सांगता केली. या वेळी उपस्थित मुख्याध्यापक रोडे सर, नरवडे मंगलताई मॅडम, काकडे सर, बारवे सर, बाचकर सर,आणि उपस्थित पालक, शालेय विद्यार्थी वर्ग.