राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी शहरातील नामांकित शाळा बालविद्या मंदिर राहुरी या शाळेत आज दिनांक 28-6-2023 रोजी वेळ सकाळी 8:00ते 11:00 या वेळेत सामाजिक बांधिलकी जपत विठू नामाचा गजरात बालविद्या मंदिर प्रशालेतून दिंडीचे प्रस्तान करुन दिंडी कासार गल्ली, शिवाजी चौक, शनि मंदिर तसेच आनंद त्रुषी उद्यान येथे विठूरायाच्या मंदिरात नामघोषात आरती व पसायदान घेऊन प्रसाद व पाण्याचा बाटल्यांच वाटप करून पुढे दिंडीचे बालविद्या मंदिर शाळेत प्रस्थान झाले.
या दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे चिंमुकल्यांनी सर्व समाजापुढे एक आदर्श निर्माण करून सर्व धर्म समभावाची एकी दाखवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.विठू माऊलींच्या गजरांने राहुरी शहर परिसर दनदनून गेला.मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना त्यांना जनू आपण खरोखरच विठूरायाच्या पंढरित पायी चालत जात आहोत असे वाटले त्यामुळे सर्व चिंमुकल्या वारकर्यांच्या चेहर्यावर एक आनंद दिसला तसेच हे चिमुकले पारंपारिक पोशाखात खुप सुंदर दिसत होते.सर्व शिक्षकवृंद व पालक गावकरी यांनी दिंडीमध्ये सहभाग दर्शवून दिंडीचा आनंद लुटला.
सर्व धर्म समभावाचे चिमुकल्या वारकर्यांच्या रुपात राहुरी शहरातील नागरिकांना झाले दर्शन

0Share
Leave a reply