राहुरी प्रतिनिधी / रमेश खेमनर : राहुरी तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत वावरथ येथे दिनांक २७/०६/२०२३ रोजी उपसरपंच सौ, शारदा भिमराज जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली, यावेळी सरपंच सौ प्रतिभा ज्ञानेश्वर बाचकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी कर्तव्यदक्ष ग्रामसेवक योगेश मच्छिंद्र चंद यांनी गेले पाच वर्ष ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शी व उत्कृष्ट, मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी आणून, काम केल्याबद्दल व शरद सानप साहेब यांची ग्रामसेवक म्हणून नियुक्ती झाली असता त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पं, स, सभापती, अण्णासाहेब सोडनर, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब केदार, धोंडीभाऊ बाचकर, गंगाराम दुधवडे, आप्पासाहेब बाचकर, भागवत पवार, गणपत बाचकर, सखाराम जाधव, अविनाश बाचकर, विलास बाचकर, दामू जाधव , हरिभाऊ जाधव, मिनीनाथ जाधव, दगडू बाचकर, गोपीनाथ दुधाडे, पांडुरंग शेलार, माऊली पोपळघट, ग्रामस्थ यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
राहुरी तालुक्यातील वावरथ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ.शारदा भिमराज जाधव यांची बिनविरोध निवड

0Share
Leave a reply