Disha Shakti

कृषी विषयी

सर्व शेतकरी बांधवांनी मोबाईल ॲप द्वारे ई-पीक पाहणी करून घ्यावी

Spread the love

नांदगाव प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे :  (नाशिक) : ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या साह्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतः मोबाईल ॲप वरून आपल्या, सातबारावर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या ॲपमध्ये आतापर्यंत सुमारे 1.88 कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांची रजिस्ट्रेशन केलेले आहे. आपल्या पिकाची नोंदणी केली आहे. खरीप हंगाम 2023 पीक नोंदणीसाठी ई पीक पाहणी चे 2.0.11 हे अपडेट वर्जन गुगल प्ले स्टोर वरून उपलब्ध करून देण्यात आले आहे, तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन वर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे.

खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष इ पीक पाहणी मोबाईलद्वारे पीक पाहणी नोंदणीसाठी एक जुलाई 2023 पासून प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. तरी राज्यातील सर्व शेतकरी बंधूं भगिनींना आवाहन करण्यात येते की त्यांनी खरीप हंगाम 2023 साठी दिलेला कालावधीमध्ये आपली ई पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपणास अडचण येणार नाही. असे आव्हान श्रीरंग तांबे उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई -पीक पाहणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य -पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!