Disha Shakti

Uncategorized

महाराष्ट्र जिल्हा परिषद लिपीक वर्गीय पुणे जिल्हा संघटनेस मान्यता – शेखर गायकवाड

Spread the love

इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे

दिशा शक्ती न्युज: महाराष्ट्र जिल्हा परिषद लिपीक वर्गीय पुणे जिल्हा संघटनेस मान्यता प्राप्त संघटना म्हणून प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती जिल्हाअध्यक्ष शेखर गायकवाड यांनी दिली.
ग्राम विकास विभागाकडील शासन पूरक पत्र दिनांक 20.9.2022 मधील मुद्दा क्र. 2 मध्ये मान्यता प्राप्त संघटनेबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद (शिक्षक वगळून) कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार मान्य्ता प्राप्त संघटना म्हणजे ज्या संघटना Maharashtra Recognition of Trade Unian and Prevention of Unfair Practice Act, 1971 च्या कलम 12 नुसार औद्योगिक न्यायालयाकडून मान्यता प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.अशी तरतूद जिल्हा परिषदेकडील कर्मचारी संघटनांबाबत करण्यात आली आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद लिपीक वर्गीय संघटना जिल्हा पुणेच्या शाखेस शासन पत्रानुसार मान्यता मिळणेबाबत MRTU अंतर्गत औद्योगिक न्यायालय पुणे येथे अर्ज क्र. 14/2022 अन्वये दाखल करण्यात आला होता. त्यानुसार दिनांक 17.6.2023 रोजी जिल्हा शाखा पुणेस मान्यतेच्या बाबत मा.औद्योगिक न्यायालयाचे आदेश निर्गमित झालेले असून दिनांक 27.6.2023 रोजी मान्यता प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.

सदरचे संघटनेच्या जिल्हा शाखा पुणेस औद्योगिक न्यायालय पुणे येथून मान्यता प्राप्त प्रमाणपत्र मिळणेबाबत संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष तथा जिल्हा कार्यध्यक्ष श्री उमाकांत सुर्यवंशी यांनी औद्योगिक न्यायालयामधील वकिलांशी माहिती घेवून संघटना मान्यतेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे दाखल केली. संघटना मान्यतेचे कामकाज संघटनेच्या वतीने ॲङ जाकिर आतार यांनी पाहिले. संघटना मान्यतेमध्ये त्यांची मोलाचा वाटा आहे.

तसेच संघटनेचे सर्व सदस्य पदाधिकारी यांनी देखील आजपर्यंत संघटनेच्या कामकाजामध्ये मोलाची भूमिका बजावली असून संघटना मान्यता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी खालील पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
श्री. शेखर गायकवाड – जिल्हा
अध्यक्ष श्री. किशोर कुलकर्णी – जिल्हा सचिव
श्री. मनोहर वन्नम – जिल्हा सहसचिव,
श्री.रेवलिंग यादव – जिल्हा कोषाध्यक्ष
श्री. सुहास संचेती – जिल्हा सहसचिव
श्री. इंद्रजित जाधव – जिल्हा उपाध्यक्ष
श्री. नाना मारकड – जिल्हा उपाध्यक्ष
सौ. रेश्मा शेख – महिला संघटक
श्री. विनय पुरोहित – प्रसिध्दी प्रमुख
श्री. सुरेंद्र सौदागर – प्रसिध्दी प्रमुख
श्री. शशिकिरण कालेकर – सदस्य
श्री. विकास पापळ – प्रसिध्दी प्रमुख


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!