प्रतिनिधी / शेख युनूस : राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथे बकरी ईद अतिशय शांततेत आणि कुणालाही कसल्या प्रकरचा गाल बोट न लागता नमाज पठण करण्यात आली. सविस्तर माहिती अशी की, बकरी ईद हा सण मुस्लिम बांधवांचा महत्वाचा आहे. इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार हजरत इब्राहिम साहब हे त्यांचा मुलगा हजरत इस्माईल याला अल्लाहच्या आदेशाने कुर्बान करायला निघाले होते, तेव्हा अल्ल्हाने त्यांच्या मुलाला जीवदान दिले त्यामुळे बकरी ईद हा सण साजरा केला जातो.
रमजानच्या पवित्र महिन्यानंतर मुस्लिम बांधव सुमारे 70 दिवसांनी बकरी ईद साजरी करतात. इस्लाम धर्मातील प्रमुख पैगबरापैकी हजरत इब्राहिम हे एक होते, यांच्यामुळेच कुर्बानी देण्याची परंपरा सुरु झाली. अल्ल्हाने एकदा हजरत इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन त्यांना त्यांची सर्वात प्रिय वस्तू कुर्बान करण्यास सांगितले असे मानले जाते. इब्राहिम यांना त्यांचा एकुलता एक मुलगा सर्वांधिक प्रिय असून त्यांना वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धपकाळात पुत्रप्राप्ती झाली होती. मात्र अल्लाह चा आदेश मानून ते त्यांच्या प्रिय मुलास कुर्बान करण्यास तयार झाले होते.
अल्ल्हाच्या मर्जीसमोर कुणाचे काहीही चालत इब्राहिम आपल्या मुलाची कुर्बानी देण्यासाठी त्याला घेऊन निघाले होते तेव्हा रस्त्यात त्याची एका व्यक्तीशी भेट झाली आणि तो म्हणाला की तुम्ही तुमच्या मुलाला का कुर्बान करायला निघाला आहात ?त्याचे म्हणणे ऐकल्यावर त्यांचे मनही ड ग मगू लागले आणि ते विचारात पडले, मात्र काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांनी अल्लाह ला वचन दिले आहे. मुलाच्या प्रति असलेले प्रेम कुर्बान देताना आड येऊ नये म्हणून त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आणि कुर्बानी दिली. कुर्बानी दिल्यावर त्यांनी डोळ्यावरील पट्टी हटवल्यावर त्यांचा मुलगा हसता खेळता दिसला, अल्ल्हाने चमत्कार केला आणि मुलाच्या जागी दुम्बा कुर्बान झाल्याचे त्यांच्या लक्षात निदर्शनात आले. इब्राहिम यांच्या मुलाचे प्राण वाचले आणि दुम्बा कुर्बान देण्यात आला, तेव्हापासून कुर्बानी देण्याची प्रथा सुरु झाली असे सांगितले जाते.
यावेळी उपस्थित हाजी गणी भाई, मौलाना नासीर सय्यद, अकबर शेठ, मोहंमद शेख सामाजिक कार्य कर्ते, बाबाजान शेख साहेब, अब्दुल भाई शेख, मौलाना उबेद, मोलांना सोहेल,मुशरफ भाई, जमाल हाजी, जिल्हा प्रति निधी शेख युनूस, रफीक शेठ शेख चिकन शॉप, जावेद शेख, नवेद शेख, व मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित राहून बकरी ईद नमाज पठण केले.