Disha Shakti

इतर

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे अपघाती दु:खद निधन

Spread the love

बिलोली प्रतिनिधी /साईनाथ गुडमलवार : नांदेड शहर बिलोली तालुक्यातील धुरंदर राजकारणी म्हणून ओळख असलेले कोल्हेबोरगांव येथील रहिवासी व नांदेड जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी अध्यक्ष बाबाराव जमनाजी एंबडवार (वय 72) यांचे अपघाती निधन झाले आहे. पुणे सोलापूर हायवेवर सोलापूर पासून 40 किलोमीटर अंतरावर माळवत चिखली या गावाजवळ 1 जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांची कार ट्रकला धडकली या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. बाबाराव एंबडवार पुण्याला आपल्या मुलाला भेटण्यासाठी कार ने जात होते. यामुळे पुणे सोलापूर हायवेवर माळवत चिखली या गावाजवळ शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांची कार रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर आदळी या अपघातात बाबाराव एंबडवार यांचा जागीच मृत्यू झाला अपघात घडल्यानंतर जवळपास दीड तास त्यांना मदत मिळू शकली नाही. त्यामुळे कार मध्येच अडकून होते दीड तासानंतर क्रेनच्या सहाय्याने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या अपघातात त्यांचा चालक करीमखान पठाण व रामचंद्र मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या निकटवृत्तीयांनी यांनी दिली.

कोल्हेबोरगांव ग्रामपंचायतचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे 12 वर्ष सभापती,बिलोली पंचायत समितीचे सभापती,जिल्हा परिषदेचे दोन वेळा उपाध्यक्ष, आरोग्य व शिक्षण सभापती ते शिवसेना पक्षाकडून जिल्हा परिषदेस दोन वेळेस अध्यक्ष पद असा त्यांचा राजकीय प्रवास होता, बिलोली तालुक्यातील आरळी जिल्हा परिषद गटातून ते पाच वेळा सदस्य म्हणून निवडून आले तसेच एक वेळेस अरळी जिल्हा परिषद मधून बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आले चेतना शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून आज त्यांची तालुक्यात ओळख होती. बाबाराव एंबडवार यांचा अपघाती निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली असुन अनेक राजकीय मडंळीनी त्यांचा निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.त्यांचा पार्थिवावर कोल्हेबोरगांव येथे सायंकाळी 5:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांचा पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!