Disha Shakti

इतर

नांदेड जिल्ह्यातील उघडपणे चालू असलेले अवैध धंदे बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे कांडाळकर यांची मागणी

Spread the love

नांदेड प्रतिनिधी / साजिद बागवान : नांदेड जिल्ह्यमध्ये विविध ठिकाणी उघडपणे अवैध धंदे सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करून नागरिक व गरीब वर्गातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी चे निवेदन आरपीआय आठवले गटाचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धममदीप भद्रे कांडाळकर यांनी जिलाधिकारी नांदेड यांना दिले आहे. नांदेड शहरातील व समस्त तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अवैधपणे उघड उघड देशी दारू मटका जुगार व विविध प्रकारे होणारे अवैध धंदे जोमात सुरू आहेत. मटका, गुटका व दारूमुळे कित्येक घराचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.

प्रशासनाला गांभीर्य नसल्याने दिसून येत आहे. प्रशासन या गोष्टीकडे कानाडोळा कशामुळे करत आहे. हे काही समजत नाही त्यामुळे सदरील गांभीर्यतीने लक्षात घेऊन त्वरित मार्ग काढून सदर जिल्ह्यातील होणारे अवैध धंदे बंद करण्यात यावे व अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संविधानिक मार्गाने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करून आपले लक्ष वेधून घ्यावे लागेल यांची सर्व प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मागणी चे निवेदन आरपीआय आठवले व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे कांडळकर यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांना देण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!