Disha Shakti

Uncategorized

एन.सी.सी.च्या छात्रांनी प्रात्यक्षिकाद्वारे दाखविली युध्दाची झलक

Spread the love

आपले ध्येय नेहमी मोठे ठेवा- ब्रिगेडीअर उमेशकुमार ओझा

दिशा शक्ती न्युज / प्रमोद डफळ : राहुरी विद्यापीठ, दि. 5 जुलै, 2023 आपले कुतुहल नेहमी जागृत ठेवले तर आपण परिपूर्ण बनतो. नेहमी लहान मुलांसारखे प्रश्न विचारीत रहा जेणेकरुन तुमच्या ज्ञानात भर पडेल. जीवनात नेहमी मोठे ध्येय ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करा असे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडीअर उमेशकुमार ओझा यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठात 26 जून ते 6 जुलै, 2023 या कालावधीत एन.सी.सी.चा कॅम्प आयोजीत करण्यात आला होता. या कॅम्पच्या समारोप प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ब्रिगेडीअर उमेशकुमार ओझा बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, 17 महाराष्ट्र बटालीयनचे कमांडींग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अतुल अत्रे उपस्थित होते.

आपल्या भाषणात ब्रिगेडीअर ओझा पुढे म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत हार न मानता मोठ्या धैर्याने आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी मेहनत करा. नेहमी असे काम करा की ज्यामधुन स्वतःला आनंद मिळेल. 10 वी तसेच 12 वी नंतर दोन ते तीन पर्याय असे ठेवा की ज्यामुळे तुमचे करियर यशस्वी होईल. यावेळी एन.सी.सी.च्या 10 छात्रांनी युध्दाचे प्रात्यक्षिक दाखवीले. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात कॅम्पच्या कालावधीत आयोजीत करण्यात आलेल्या हॉलीबॉल, फुटबॉल, रिले रेस अशा प्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या छात्रांना मान्यवरांच्या हस्ते पारिताषीके देण्यात आली. याप्रसंगी या कॅम्पसाठी आलेले अहमदनगर जिल्ह्यातील विविध माध्यमीक विद्यालयातील 500 एन.सी.सी.चे छात्र व त्यांना मार्गदर्शन करणारे लेफ्ट. कर्नल रणदीप सिंह एन.सी.सी.चे अधिकारी मेजर संजय चौधरी, लेफ्ट. सुनिल फुलसावंगे, सुभेदार मेजर लोकेंद्रा सिंह, चीफ ऑफिसर बाळासाहेब गांगुर्डे, फर्स्ट ऑफिसर अशोक आमटे आणि उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!