बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : कासराळी येथील सामाजिक कार्यकर्ते,जन माणसात नावलौकिक असलेले त्यांचा कार्याची दखल घेत रोजगार हमी मा.ता.अध्यक्ष, डाॅ.खाकय्यअप्पा बडय्यअप्पा स्वामी यांची बिलोली तालुका काँग्रेस डॉक्टर सेल अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
याबाबतचे नियुक्ती पत्र माजी मुख्यमंत्री मा.अशोकराव चव्हाण यांच्या सूचने नुसार ,माजी मंत्री,माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्य हास्ते नियुक्तीपत्र ४ जुलै रोजी खतगावकर यांच्या निवास्थानी नांदेड येथे देण्यात आले. यावेळी माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील नागोरीकर, मा.जिल्हा परिषद सदस्या डॉ. मिनलताई खतगावकर, बिलोली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील पाचपिपळीकर, जिल्हा उपाध्यक्ष आनंद पाटील बिराजदार, रवी पाटील, दिलीप पांढरे, संतोष पाटील खतगावकर यांच्यासह बहुसंख्या काँग्रेस पदाधिकारी उपस्थिती होते या निवडीने बिलोली शहरातून डाॅ.के.बी.कासराळीकर याचा मित्र परिवारातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.
Leave a reply