Disha Shakti

इतर

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी रस्त्यावर टँकर पलटी होऊन पेटला; दोघांचा होरपळून मृत्यू

Spread the love

प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी रस्त्यावरील केळवंडी शिवारात इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकरने पलटी होऊन पेट घेतला. या आगीमध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला.या घटनेत टँकर पूर्णतः आगीच्या विळख्यात सापडला. टँकरमधील चारजण जखमी झाले आहेत.

जखमींवर पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. गणेश रामराव पालवे (वय ४२, रा. पालेवाडी), सुरैया बशीर शेख (वय ४६, रा. माळी बाभूळगाव, ता.पाथर्डी) असे दोन जण आगीत जळून मृत झाले आहेत. लहू सांडू पवार (वय ५३), सुमन लहू पवार (वय ४९), जगदीश जगन पवार (वय ३), कोमल जगन पवार (वय ७, रा. विसरवाडी, ता. पैठण), टँकरचा मुख्य चालक दादासाहेब केकाण ( रा.पालवेवाडी) असे जखमींची नावे आहेत. गणेश पालवे हा या टँकरचा दुसरा चालक टँकरच्या डाव्या बाजूला बसलेला होता. त्याच बाजूने टँकर उलटल्याने तो टँकर खाली सापडला. त्यामुळे तो आगीमध्ये जळून खाक झाला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!