शिर्डी विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज़ शिर्डी दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिर्डीतील घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. द्रौपदी मुर्मू या मंगळवारी संध्याकाळी नागपुरात दाखल झाल्या. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावर गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बुधवारी गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली.
द्रौपदी मुर्मू या परवा दिवसभराच्या कार्यक्रमांना हजेरी लावून काल मुंबईत दाखल झाल्या. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस हे हजर होते. त्यानंतर राजभवनावर राष्ट्रपतींसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपतींचा हा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा आहे. राष्ट्रपती आज़ शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील घडामोडींना वेग आला आहे. पोलीस आणि प्रशासन या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले आहेत.
‘असा’ असेल राष्ट्रपतींचा दौरा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं शिर्डी विमानतळावर आज़ दुपारी 12 वाजता आगमन होणार आहे. विमानतळावर त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ते साईबाबांच्या मंदिरापर्यंत दहा ते बारा किमीचा प्रवास कारने करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रपती शिर्डीत येणार असल्याने प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहेशिर्डीला छावणीचं स्वरुप
साईबाबा संस्थान, पोलीस प्रशासन सर्व गोष्टींची काळजी घेत आहेत. सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील हजर राहणार आहेत. तर राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत प्रचंड सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीला छावणीचं स्वरुप आलं आहे.
Leave a reply