दिशा शक्ती न्युज : प्रमोद डफळ (राहुरी प्रतिनिधी) – दिव्यांगाचे आधारस्तंभ प्रहार दिव्यांगाचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस दिव्यांग स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्यात आला. राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या वतीने रक्तदान शिबीर व दिव्यांग अंतोदय रेशन कार्ड चे वाटप शिबिराचे आयोजन रोडरी क्लब ब्लड बँक राहुरी या ठिकाणी करण्यात आले. राहुरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष तालुका सल्लागार बाबुराव शिंदे सर होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले. यामध्ये त्यांनी सांगितले 2013 पासून प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते यामध्ये दिव्यांग असणारे चेतन मोरे व प्रवीण मेहत्रे प्रत्येक वेळी रक्तदान करतात राहुरीत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर,मोफत दंत तपासणी शिबिर, रक्तदान शिबीर, दिव्यांगाना अंत्योदय रेशनकार्ड चे वाटप, विवीध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
मोतीबिंदु शस्त्रक्रिया व दंतरोग मोफत तपासनी मधे जवळपास 100 लोकानी लाभ घेतला यावेळी राहुरी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करून अंत्योदय कार्ड मिळून दिले त्याचे वाटप जिल्हाअध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख राहुरी तालुका सामाजिक कार्यकर्ते अशोकराव तुपे अध्यक्ष योगेश लबडे तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले , शहरसचिव सुखदेव कीर्तने, अनामिका हारेल मॅडम, ह.भ.प नाना महाराज शिंदे बाबासाहेब मुसळे बाळासाहेब गांडळ शशिकांत कुऱ्हे सोमनाथ काळे वांबोरी गणेश कारंडेभारत आढाव दिलीप काळे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले होते.
Leave a reply