नांदेड प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे कांडाळकर : मागील दिवसापासून महाराष्ट्राचे राजकारण ज्या खालच्या पद्धतीने चालले आहे त्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे हा रोष व्यक्त होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व नायगाव तालुका अध्यक्ष राजेश दादा ताटेवाड व मनसे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि 10/ 07/2023. रोजी नायगाव हेडगेवार चौक येथे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नायगाव तालुक्याच्या वतीने एक सही संतापाची हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी नागरिकांनी आपल्या मनातील खदखद त्रिव नाराजी लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त केली. तसेच तक्रारी सूचना रोष लिखाणाच्या माध्यमातून नागरिकांनी व्यक्त केल्या मनसेच्या या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला हा कार्यक्रम मनसे गगेश शिंदे ता सचिव प्रकाश जाधव, ता उपाध्यक्ष साईनाथ चैनपुरे, ता.उपाध्यक्ष चंद्रकांत टोकेवार शहर अध्यक्ष यांच्यासह युवा मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a reply