प्रतिनिधी / प्रमोद डफळ (अहमदनगर) दि. १२ जुलै – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, अहमदनगर बार असोसिएशन व सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने व मा. श्री. सुधाकर यार्लगड्डा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर व प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. सुधाकर यार्लगड्डा, प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश हे होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना न्यायालयातील कामकाजाविषयी माहिती सांगितली. तसेच न्यायालयाची पायरी चढताना मनातली भीती काढून टाकली पाहिजे, असे प्रतिपादन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना माहितीचे केंद्र म्हणून झाली पाहिजे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची प्रस्तावना, मा.श्रीमती. भाग्यश्री पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांनी केली. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्रीमती. एम. ए. बरालिया, जिल्हा न्यायाधीश -2 ॲड. श्री. संजय पाटील,अध्यक्ष अहमदनगर बार असोसिएशन, इतर पदाधिकारी,जेष्ठ विधीज्ञ सी.डी. देशमुख लाॅ.कॉलेजचे विद्यार्थी व प्रियदर्शनी विद्यालयाचे विद्यार्थी तसेच सर्व मा. न्यायिक अधिकारी, पॅनल विधीज्ञ, लोक अभिरक्षक कार्यालयातील विधीज्ञ उपस्थित होते.
कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रबोधन रॅलीचे आयोजन जिल्हा न्यायालयापासून करण्यात आले. रॅलीची सुरुवात मा. श्री. सुधाकर यार्लगड्डा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर करण्यात आली. त्यावेळी मा.ॲड. संजय पाटील, अध्यक्ष अहमदनगर बार असोसिएशन, मा.ॲड. राजाभाऊ शिर्के ,मा.ॲड.श्री. सतीश पाटील, जिल्हा सरकारी वकील, ॲड. राजेश कावरे ॲड. सुरेश लगड, ॲड अनिल सरोदे व इतर विधीज्ञ, सी.डी लॉ. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य श्री. रियाज बेग, प्राचार्य सी.डी देशमुख लॉ. कॉलेज, अहमदनगर, प्रियदर्शनी विद्यालयाचे शिक्षक महेश वांडेकर,सहशिक्षिका नीता तनपुरे, हेलीना जोसेफ उपस्थित होते. रॅली पुढे गेल्यानंतर डी.एस.पी चौकात प्रियदर्शनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक लोकसंख्या या विषयावर पथनाट्य सादर केले. पथनाट्य पाहण्यासाठी पादचारी यांची गर्दी जमली होती. सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची प्रस्तावना मा.श्रीमती. भाग्यश्री पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांनी केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्रीमती. एम. ए. बरालिया, जिल्हा न्यायाधीश -2 ॲड. श्री. संजय पाटील,अध्यक्ष अहमदनगर बार असोसिएशन, इतर पदाधिकारी,जेष्ठ विधीज्ञ सी.डी. देशमुख लाॅ.कॉलेजचे विद्यार्थी व प्रियदर्शनी विद्यालयाचे विद्यार्थी तसेच सर्व मा. न्यायिक अधिकारी, पॅनल विधीज्ञ, लोक अभिरक्षक कार्यालयातील विधीज्ञ उपस्थित होते.
कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रबोधन रॅलीचे आयोजन जिल्हा न्यायालयापासून करण्यात आले. रॅलीची सुरुवात मा. श्री. सुधाकर यार्लगड्डा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर करण्यात आली. त्यावेळी मा.ॲड. संजय पाटील, अध्यक्ष अहमदनगर बार असोसिएशन, मा.ॲड. राजाभाऊ शिर्के ,मा.ॲड.श्री. सतीश पाटील, जिल्हा सरकारी वकील, ॲड. राजेश कावरे ॲड. सुरेश लगड, ॲड अनिल सरोदे व इतर विधीज्ञ, सी.डी लॉ. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य श्री. रियाज बेग, प्राचार्य सी.डी देशमुख लॉ. कॉलेज, अहमदनगर, प्रियदर्शनी विद्यालयाचे शिक्षक महेश वांडेकर,सहशिक्षिका नीता तनपुरे, हेलीना जोसेफ उपस्थित होते.
रॅली पुढे गेल्यानंतर डी.एस.पी चौकात प्रियदर्शनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक लोकसंख्या या विषयावर पथनाट्य सादर केले. पथनाट्य पाहण्यासाठी पादचारी यांची गर्दी जमली होती. सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.
HomeUncategorizedजागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर व रॅलीचे आयोजन, प्रियदर्शनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले पथनाट्य सादर
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर व रॅलीचे आयोजन, प्रियदर्शनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले पथनाट्य सादर

0Share
Leave a reply