पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा व्हावा आपल्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक हित जोपासले जावे हा उदात्त हेतू ठेवून हार बुके फेटा यांना फाटा देत युवा नेते निघोज गावचे आदर्श उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली वरखडे यांनी आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने निघोज येथे साजरा केला. वरखडे यांनी वाढदिवसानिमित्ताने वृक्ष रोपण व वृक्ष संवर्धन ही मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात त्यांनी निघोज येथून केली वाढदिवसानिमित्ताने सुजलम सुफलम निघोज हा संकल्प त्यांनी केला आहे.
यावेळी प्रभाकर कवाद, सचिन पाटील वराळ, ज्ञानदेव लंके, भाऊसाहेब विठोबा लामखडे, चंद्रशेठ वाबळे, विठ्ठल गोविंद लामखडे, भास्करभाऊ वराळ, रमेश वरखडे, ज्ञानदेव घोगरे बाळासाहेब वरखडे, उत्तमशेठ लामखडे, दिलीप ढवण, बबन वरखडे, आस्लम इनामदार, बाजी लामखडे, खोसे मामा, बबन लामखडे, बाळासाहेब लामखडे, लहुशेठ इरोळे खंडुशेठ घुले, अर्जुन लामखडे, सुभाष शेटे, विष्णु वरखडे, बाबाजी वरखडे, सुभाष वरखडे, सुनिल लामखडे, बाबाजी लामखडे, सुभाष वरखडे, संदिप वरखडे, संपत वरखडे, सुदाम वरखडे अविनाश वरखडे, गंगा वरखडे, विकास वरखडे, शैलेश ढवळे, संतोष वरखडे, संकेत लामखडे, अक्षय वरखडे, नवनाथ लामखडे, सुदाम लामखडे, अविनाश लामखडे, सतिष लामखडे सौरभ ढवळे, निवृत्ती वरखडे, आकाश वराळ, वैभव वरखडे, रवी लामखडे, नवनाथ खोसे, शैलेश लामखडे, शुभम लामखडे, ठकाराम वरखडे, दादाभाऊ वरखडे, किरण वरखडे तेजस वरखडे,सुशांत वरखडे, ओमकार वरखडे आदी सहकारी व ज्ञानेश्वर उर्फ माऊली वरखडे यांचा मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
निघोज जिल्हा परिषद गटाचे नेते सचिन पाटील वराळ यांच्या माध्यमातून व सहकार्याने निघोज मध्ये उपसरपंच पदाच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे ज्ञानेश्वर उर्फ माऊली वरखडे हे करत आहेत. वार्ड क्रमांक तीन मध्ये गेल्या अडीच वर्षात एक कोटी पेक्षा जास्त विकास कामे मार्गी लावली आहेत. त्यामध्ये शिवडी अंगणवाडी शाळा बांधणे, लामखडे वस्ती अंगणवाडी शाळा बांधणे, लामखडे वस्ती शाळा दुरुस्ती, निघोज वरखडे वस्ती स्ट्रेट लाईट, दत्त मंदिर संरक्षण भिंत बांधणे, दर्याचा मळा काँक्रिटिकरण करणे, इरोळे वस्ती काँक्रिटिकरण करणे, वरखडे वस्ती येथे वृक्ष लागवड, आदी कामांचा समावेश आहे यापुढेही गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत वरखडे यांनी व्यक्त केले आहे.
HomeUncategorizedनिघोजचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने वरखडेंचा सुजलम सुफलम निघोज हा संकल्प
निघोजचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने वरखडेंचा सुजलम सुफलम निघोज हा संकल्प

0Share
Leave a reply