धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव जिल्ह्यातील कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्याविरुद्ध उघडलेली धडक मोहीम यामुळे धंदेवाल्याने एम रमेश यांची चांगलीच धास्ती घेतली असून प्रतीक्षा फक्त त्यांच्या बदलीची करत आहेत तर सर्वसामान्य नागरिकांतून एम रमेश यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
एम रमेश यांनी उमरग्यातील डान्सबार वर कारवाई करून जवळपास 58 लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करून अनेक आंबट शौकिनावर गुन्हे दाखल केले असून तसेच वाशी तालुक्यात वाशी येथे तिरट जुगारावर दहाड टाकून दहा लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक बडे मासे जाळ्यात अडकले आहेत.ढोकी येथे मटका जुगार ऑनलाईन भिंगरी चालकावर कारवाई करून 25 जणांची दिंड काढण्यात आली अशा अनेक धडाकेबाज कारवायामुळे अवैध धंदेवाल्याने एम रमेश यांची धास्ती घेतली असून अवैध धंदेवाले एम रमेश यांची बदलीची प्रतीक्षा करत आहेत.
तेर येथील रासपा धाराशिव तालुकाध्यक्ष सचिन देवकते, रासपा कार्यकर्ते सोमनाथ धायगुडे,रमेश लकडे, पवन माने, पत्रकार विजय कानडे यांचेकडून सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश व त्यांच्या टीमचा कळंब येथे जाऊन सत्कार करण्यात आला.
Leave a reply