Disha Shakti

Uncategorized

सातबाऱ्या वरील भूविकास बँकेचा कर्जाचा बोजा होणार आता कमी,सुजित झावरे यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जदारांना दिलासा

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सन १९९३- ९४ साली भूविकास बँकेकडून कर्ज घेतले होते. सदर शेतकरी वर्गाची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने कर्ज भरणे शक्य नव्हते. याबाबत सन २०२२ साली सुजित झावरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यांतील शेतकरी वर्गासोबत मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मा.जिल्हाधिकारी साहेबांनी सदर अहवाल सहकार मंत्रालय, महाराष्ट्र राज्य. याचेकडे पाठविण्यात आले.

सुजित झावरे पाटील यांनी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच सहकार मंत्री, अतुल सावे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मा. देवेंद्र फडणवीस यांनी अप्पर मुख्य सचिव, सहकार विभाग यांच्याशी चर्चा करून सदर शेतकरी वर्गाचे कर्जमाफी करणेबाबत अध्यादेश काढण्याचे आदेश दिले. याबाबत तत्पर कारवाई करत ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करणेबाबत शासन निर्णय काढण्यात आले. परंतु अद्याप देखील याबाबत स्थानिक पातळीवर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जेदार म्हणून भुविकास बँकेचे नाव असून कर्जदार शेतकऱ्यांचे नाव इतर हक्कात गेली आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्यांना पीककर्ज, अतिवृष्टी नुकसान भरपाई, पीकविमा रक्कम, शासकीय योजनेचा लाभ व इतर शासकीय अनुदान या सर्व सवलतीपासून वंचित रहावे लागत आहे.

आज मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तात्काळ संबंधित अधिकारी वर्गाने जमिनीवरील बोजा कमी करणेबाबत गावातील तलाठ्यांना आदेश देण्यात आले.यावेळी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वर्गाच्या वतीने सुजित झावरे पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!