Disha Shakti

Uncategorized

देगलूर शहरातील बंद असलेले सी सी टीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करण्याची मागणी

Spread the love

देगलूर प्रतिनिधी / ज्ञानोबा सुरनर : देगलूर शहरात वाढते चोरीचे प्रमाण पाहता देगलूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे शहरांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले शालेय व खाजगी शिकवणीला जाणाऱ्या मुलीचे छेडछाडीचे प्रमाण वाढले शहरातील रस्त्यावर चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातून सोन्याचे दागिने जबरदस्तीने खेचून घेऊन पळून जाणे शहरातून ठिकठिकाणी मोटरसायकल चोरी जाणे शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही ताबडतोब सुरू करण्यात यावे अशा तक्रारीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रशांत दासरवार माझी नगरसेवक तथा भाजपा गटनेता नगरपरिषद देगलूर, गंगाधर दाऊलवार भाजपा शहर सरचिटणीस, भुमन्ना चिल्लरवार भाजपा शहर उपाध्यक्ष देगलूर, संजीव पांचाळ भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक, बालाजी पाटील थोटवाडीकर भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, सचिन कांबळे भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष, संग्राम सूर्यवंशी भाजपा अनुसूचित आघाडी, अजीम अन्सारी भाजपा मोर्चा अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष, गणेश शेरलावार

या सर्वांनी मिळून देगलूर पोलीस स्टेशन येथे व मुख्याधिकारी देगलूर नगरपरिषद देगलूर यांना निवेदन देऊन विनंती केली आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!