Disha Shakti

Uncategorized

ग्रामसेवक अमोल साळवे यांचा शेरी चिखलठाण ग्रामस्थांनी मोठ्या थाटामाटात निरोप समारंभ

Spread the love

शेख युनूस / अ. नगर प्रतिनिधी : राहूरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथील ग्रामसेवक अमोल साळवे यांची नेवासा या ठिकाणी बदली झाल्याने शेरी चिखलठाण ग्रामस्थ यांच्या वतीने जाहीर सत्कार करत निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
ग्रामसेवक अमोल साळवे यांनी शेरी चिखलठाण गावासाठी भरपूर योजना राबवत विविध विकासाची कामे हाती घेत परिपूर्ण केली. काम दाखवा आणि काम करून घ्या ही संकल्पना राबवत आपल्या कामाचा ठसा उमटवला.

अमोल साळवे यांच्या कामाचा गौरव म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेरी चिखलठाण येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन साळवे यांचा जाहीर सत्कार केला. शेरी चिखलठाण गावातील आदिवासी लाभार्थी यांना घरकुल योजने अंतर्गत घरकुल उभारून दिले. राहूरी पंचायत समितीने सुद्धा अमोल साळवे यांना गौरव पुरस्कार प्रदान केला आहे.
चिखलठाण गावातील पिण्याचे पाणी याचे नियोजनही योग्य प्रकारे पार केले.

यावेळी उपस्थित कॉमेड शरद बागुल, पिरन सय्यद, अल्ताफ शेख, सुभाष बाचकर, महादू काळणर, बाळासाहेब बर्डे, विनोद काळनर, चंद्रकांत तमनर, गणेश बागुल, चेतन काळनर,भोसले राहुल, तुकाराम पिंपळे, सलमान सय्यद आणि नव्याने रुजू झालेले ग्रामसेवक कवटे शेरी चिखलठाण ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!