Disha Shakti

Uncategorized

ज्वारीची भाकरी अन मिरचीचा ठेचा, खा. चिखलीकर यांची पाचपिपंळी येथे तरूण कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टी

Spread the love

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने 9 वर्षांचा कार्यकाल यशस्वीरित्या पुर्ण केल्याबद्दल, सेवा, सुशासन व गरीब कल्याणासाठी राबविलेल्या विविध योजना भाजपाच्या वतीने जनसामान्यापर्यंत पोहचविल्या जात आहे. मोदी @9 महा-जनसंपर्क अभियाना अंतर्गत बिलोली तालुक्यातील मौजे- पाचपिपंळी येथे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व देगलूर बिलोली विधानसभा प्रमुख तथा मा.आमदार सुभाषराव साबणे,आमदार राम पाटील रातोळीकर, लक्ष्मण ठक्करवाड नेतृत्वाखाली, रविवार दिनांक.16 जुलै 2023रोजी मौजे पाचपिपंळी येथे टिफिन (डब्बा) पार्टी बैठक आयोजित करण्यात आली होती.

लोहगांव येथे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व माजी आमदार सुभाषराव साबणे यांनी सि. सि. रस्ता व पांदन रस्ता करण्यासाठी निधी मंजुर केल्याबद्दल सदरील रस्त्याचे लोकार्पण मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. तद्नंतर पाचपिपंळी येथे संदीप पाटील रामपुरे यांचा अयोजनातुन टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्वतःचा घरून आणलेली ज्वारीची भाकरी अन मिरचीचा ठेचा व बेसन इत्यादी यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता समवेत बसून डब्बा पार्टी चा आस्वाद घेतला या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सरकारच्या योजनाची माहीती देण्यात आली.

या कार्यक्रमास बालाजी बच्चेवार, गंगाधरराव जोशी,श्रावण पाटील भिलवंडे, माणीकराव लोहगावे, उमाकांतराव गोपछडे,रोहीत पाटील, व्यकंटराव पाटील गुजरीकर, श्रीनिवास पाटील नरवाडे, बाबाराव पा.रोकडे, शंकरराव काळे, नागनाथ पाटील माचनुरकर, मारोती पा.दगडे, सुर्यकांत पाटील शिंदे,संजय पा.भोसले, मारोती राहीरे, विजयकुमार कुंचनवार, यशवंतराव गादगे, इंद्रजित तुडमे, राजकुमार गादगे, बळवंत पाटील लुटे, संजय पाटील रामपुरे, संदिप पा. रामपुरे, नागनाथ श्रीरामे, सुलोचना स्वामी, आश्विनी इंगळे, सुरेखा मॅकलोड, भाग्यश्री वरुडकर यांच्या प्रमुख उपस्थित व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख व गावकऱ्यां सोबत डबा पार्टी संपन्न झाली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!