विशेष प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अनेक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम थेट गुणवत्तेवर होत आहे. सरकारने जारी केलेले ७ जुलै २०२३ चे परिपत्रक रद्द करून राज्यात तातडीने १०० टक्के शिक्षक भरती करावी, अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.
तातडीने भरती न केल्यास राज्यभरात मोठा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.१०० टक्के शिक्षक भरतीची मागणी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना पत्र लिहून तातडीने १०० टक्के शिक्षक भरती करण्याची मागणी केली आहे. या पत्रात डॉ. तांबे यांनी म्हटले आहे की, शासनाने ७ जुलै २०२३ रोजी पत्रक काढून राज्यातील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. अनेक युवक शैक्षणिक पात्रता असूनही या जागांपासून वंचित आहे. या सर्व गोंधळाचा परिणाम संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर होत आहे.
Leave a reply