Disha Shakti

इतर

संततधार पाऊसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहा : कनिष्ठ अभियंता लालमे यांचे आवाहन

Spread the love

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : सध्या सर्वत्र संततधार पाऊसामुळे झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावध व सतर्क राहावे असे तसेच शेतकऱ्यांनी आपली जनावरे विघुत उपकरणाचा जवळ बांधु नयेत, शॉर्टसर्किट होऊन जनावरे दगावण्याची शक्यता असते त्यामुळे पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन योगेश लालमे कनिष्ठ अभियंता बिलोली यांचाकडून करण्यात आले आहे.

अतिवृष्टी व संतधार पाऊस ढगफुटी आदींमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सतत पाऊस,ढगफुडी आदींमुळे तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तु, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते.

त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेणे व सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे. पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात. यामध्ये वीजखांब वाकतात. वीजतारा तुटतात. लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.

सार्वजनिक ठिकाणी असलेले फिडर पिलर्स, रोहित्र किंवा इतर वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे. या यंत्रणेजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये.सदरील ठिकाणी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसान बाबतची वेळोवेळी माहिती संबंधित असलेल्या 33kv उपकेंद्रास/शाखा अभियंता/जनमित्रास/कळवावेत. असे आवाहन योगेश लालमे कनिष्ठ अभियंता बिलोली यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!