बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यातील अवघ्या भाविक भक्ताचे श्रद्धास्थान असलेले कासराळी येथील ग्रामदैवत खाकेश्वर भगवान मठाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या श्रावण महीनापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मठाचे सचिव लक्ष्मण ठक्करवाड, संचालक डॉ.के.बी. कासराळीकर, सोमलिंग पा.कासराळीकर, गंगाराम चरकुलवार पो.पा यांनी दिले. खाकेश्वर मठाचे बांधकाम बर्याच दिवसांपासून चालू असून मुख्यगाभारा, सभामंडप, शिखर, गिलावा, सिलींग रंगरंगोटी पुर्ण झाले आहे तसेच लाईट फिंटीग, फरशी सदरील कामे पूर्ण झाली आहेत.
आज दि.20.07.23 रोजी खाकेश्वर मठाचे विश्वस्त मंडळाच्या हस्ते कंपाउंड भिंतीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी मठाचे सचिव तथा मा.जि.प.सदस्य लक्ष्मण ठक्करवाड,संचालक डॉ.के.बी.कासराळीकर, सोमलिंग पा.कासराळीकर, गंगाराम चेरकुलवार पो.पा, सरपंच शेषराव लंके,भागवत लोकमनवार, हनमंत इजुलकंठे, सुभाष पाटील शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष,महेश पाटील हांडे,शिवाजी पा. कासराळीकर, दत्तु पा नरंगले, राम उमरीकर, नामदेव भाऊ, परमेश्वर गजलोड, भाऊसाहेब पाटील बनबरे, संग्राम इजुलकंठे, केशव रेड्डी तोटावाड, मारोती महाराज, शेषराव पाशमवाड,बाबु महाराज आदी ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येनी उपस्थित होते.
Leave a reply