दिशा शक्ती प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक आझाद मैदान मुंबई येथे धनगर समाज नेते सकल धनगर मल्हार सेना संस्थापक अध्यक्ष मा.प्रल्हाद भाऊ सोरमारे प्रा.सतीश महानोर अड. राजाराम बापू पोल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील विविध संघटनांच्या बैठकीत धनगर आरक्षण समिती महा.राज्य स्थापना करण्यात आली. या बैठकीला धनगर आरक्षण मोर्चासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या धनगर समाजाचे बांधवांसह अनेक जिल्ह्यातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महाराष्ट्रातील समाज मंडळींनी सभेला मान्यवरांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप मा.प्रल्हाद भाऊ सोरमारे साहेब यांनी आगामी काळात धनगर आरक्षण प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला व लढा लढविण्याचा संकल्प केला.
धनगर आरक्षण हा प्रश्न प्रलंबित असताना कोणत्याही नेत्यांनी विधान भवनांमध्ये एक शब्द काढला नाही याची तीव्र संताप महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये आहे.तर येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन करण्यास सर्व धनगर बांधवांनी एकत्र यावे ही विनंती प्रल्हाद भाऊ सोरमारे यांनी भाषणा मध्ये केली.
Leave a reply