Disha Shakti

सामाजिक

धनगर समाजाला एसटी आरक्षण, मेढपांळाना कायम स्वरुपी वनचरे उपलब्ध करून द्यावी. – रावसाहेब सुर्यभान पाटोळे

Spread the love

दिशा शक्ती न्यूज / राहुरी : युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मनोजभाऊ गंगाराम कोळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, दि. १७ जुलै रोजी राहुरी तहसीलदार यांना निवेदन धनगर समाजाला एसटी आरक्षण , धनगर मेढपांळाना कायम स्वरुपी वनचरे उपलब्ध करून द्यावी. या संदर्भात वारंवार आंदोलने करत आहे. कोणत्याही पक्षाच्या हाती सत्ता गेली तरी धनगर समाजाच्या हाती निराशाच भारतीय जनता पक्षाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व शिवसेनेने देखील आश्वासने दिली आहे. पक्ष प्रमुखानो आता पर्यंत आमच्या अज्ञानाचा फायदा घेवून. संत्रज्या उचलू “पदें देवून आमच्या मतांवर खुर्च्या घेऊन आपली राजकीय उखळ पिवळी करून घेतली. आता आम्हाला राजकारण कळू लागले.

प्रत्येक मतदारसंघातील ५० हजारावरील अमुल्य – मते कुठल्याही राजकीय वतनदारांना मुळीच देऊ नका. मतदार संघात आपला माणूस नसेल तर नवख्या “पक्षास उमेदवारास मतदान करा. एकाच घरात आमदारकी, खासदारकी, मंत्री लाटणाऱ्या राजकीय जागीरदाराना अव्हाल नटांना आपले आमुल्य मते देऊ नका. त्यांचे वस्त्रहरण करून घरी बसवा अन्याय अत्याचारातून मेढकयानां मारलं, धुऱ्या बंधाऱ्यावरुन जीव घेणे, आपली पोलीस स्टेशन मध्ये अधिकारी तक्रार घेत नाही.अशी आपली राजकीय अवस्था झाली.

धनगर समाजाला एसटी आरक्षण व मेंढ्यपाळांना हक्काची जमीन नाही दिली तर युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन राज्यभर करण्यात येईल असा इशारा युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यळकोट यळकोट जय मल्हार , आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाच, कोण म्हणतं देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही अशा घोषणा ही देण्यात आल्या आहेत.

प्रमुख उपस्थिती युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य महिला आघाडी उपप्रदेशाध्यक्षा सौ. मिनाताई राहिंज , अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गोरक्षनाथ दादा वाघमोडे, महिला आघाडी जिल्हा अहमदनगर अध्यक्षा सौ. लताताई आण्णासाहेब भांड, राहुरी तालुका अध्यक्ष रावसाहेब सुर्यभान पाटोळे, सचिन पाटोळे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देण्यास उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!