राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य रॅलीचे ब्राह्मणी बस स्टँड येथे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच ब्राम्हणी गावातील कार्यकर्त्यांनी स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्ष गट प्रमुख सागर वाकडे, ग्राम पंचायत सदस्य कचरू नाना वाकडे, चांगदेव भिसे, बाळासाहेब वाकडे, जालिंदर पाटोळे, चंदू वाकडे, गणेश वाकडे, जालिंदर वाकडे, श्रीकृष्ण वाकडे, किशोर सरोदे, संदीप भिसे आदींनी स्वागत केले. दरम्यान ब्राह्मणी ग्रामस्थांच्यावतीने विजय बानकर, संजय मोकाटे, पत्रकार गणेश हापसे, पत्रकार ज्ञानेश्वर सुरशे यांनी स्वागत केले.
शेतकरी संघटनेचे संजय मोकाटे यांनी कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा. अशी मागणी करत निवेदन दिले. दोन्ही सरकारच्या तारखेच्या घोळात असंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले असल्याचे जानकर यांना सांगितले. सदर प्रश्नी मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांचे लक्ष वेधून तो सोडविण्यासाठी प्रयत्न करून असे महादेव जानकर यांनी संजय मोकाटे यांना सांगितले.
Leave a reply