अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील शांताराम गोसावी यांची कुमारी अंजली गोसावी हिने बी. ए. एल. एल. बी.पदवी घेत वयाच्या 22 व्या वर्षी आपले यश संपादन करत वकिली शिक्षणात बाजी मारली. कु. अंजली हिने पहिली ते दहावी पर्यंत मंगळापूर येथे शिक्षण घेतले. अकरावी ते बारावी हे संगमनेर येथील श्रमिक जुनिअर कॉलेज येथे वाणिज्य शाखेतून शिक्षण पूर्ण केले. कु.अंजली गोसावी हिने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेतले असून आपल्या जिद्द आणि चिकाटीने बी. ए. एल.एल.बी.यशस्वीपणे कुठल्याही प्रकारे क्लास न लावता जवळपास पाच वर्षाच्या अथक परिश्रमाणे यश संपादन केले.बारावी नंतर अंजलीने 2017-18 साली ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेज संगमनेर येथे कायद्याविषय अभ्यास पूर्ण केला.
यावेळी संगमनेर तालुका दशमान गोसावी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष दशरथ गोसावी, मुख्य प्र वर्तक भागवत गिरी, कार्याध्यक्ष चंदन गोसावी, सचिन गोसावी, उपाध्यक्ष संतोष पुरी, उपाध्यक्ष रणजित गिरी, उप कार्या ध्यक्ष सुनील गोसावी, संघटक प्रदीप गोसावी, सहसचिव प्रवीण गोसावी, सदस्य ओंकार गोसावी, बाळासाहेब गोसावी, महंत नारायण गोसावी, इंदुबाई गोसावी, लीलाबाई गोसावी, राणी ताई गोसावी, संतोष गोसावी, राजाराम गोसावी, अध्यक्ष माधव पुरी, शंकर गोसावी, गोरख गोसावी व गोसावी, पुरी, आणि आदी समाज बांधव उपस्थित होते.
कु. अंजली गोसावी हिचा संगमनेर तालुका दशमान गोसावी समाज संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला असून संघटनेच्या पदाधिकारी यांनी मंगळापूर येथे जाऊन कु. अंजली गोसावी हिचा सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन गौरव सत्कार करत शाबासकीची थाप देत अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
Leave a reply