Disha Shakti

राजकीय

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी शंकर अण्णा वाघ यांची निवड झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांच्यावतीने सत्कार

Spread the love

दिशा शक्ती प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे : दि.२४, नांदगाव (नाशिक) : नांदगाव रेस्ट हाऊस येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते कडून नाशिक जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष: शंकर अण्णा वाघ यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या ठिकाणी तालुक्यातील विविध संघटना, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून जिल्हाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. धनगर दादा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष: निवृत्ती शिंदे ,संचालक: विनोद अहिरे यांच्याकडून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन करत संस्थेच्या वतीने शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला  याप्रसंगी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थित कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचे जिल्हाध्यक्षांकडे आपला मागील पाच वर्षाचा अनुभव कथन केला.
पक्ष वाढवण्यामागे कार्यकर्त्याचा खूप मोठा वाटा असतो याची जाणीव ठेवून पक्षाने कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. कार्यकर्त्यांना सामाजिक प्रश्न सोडवत असताना अनेक अडचणी येत असतात अशावेळी सर्वतोपरी मदत जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांच्यामार्फत भारतीय जनता पक्षाकडून सर्व कार्यकर्त्यांना करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांच्याकडून आश्वासित करण्यात आले. कार्यकर्त्यांनी पक्षासाठी प्रामाणिक काम करावे पक्ष वाढवावा. कार्यकर्त्यांनी आपल्याकडे काम घेऊन यावे प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेतल्या जाईल असे जिल्हाध्यक्ष शंकर अण्णा यांच्याकडून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

याप्रसंगी जयश्रीताई दौंड, दत्तराज छाजेड, पंकज खताळ, कपिल तेलुरे, राजाभाऊ बनकर, राजू पवार, नाना जाधव ,बंडू बाबा निकम, सागर फाटे,  संदीप पवार, सुनील जाधव, विनोद अहिरे, उमेश उगले, स्वप्निल शिंदे, कृष्णा त्रिभुवन, राहुल अहिरे, राजाभाऊ पवार, राजाभाऊ गुडेकर यांच्यासह तालुक्यातील पत्रकार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी सूत्रसंचालन करताना धनगर दादा संस्थेचे संचालक व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विनोद भाऊ अहिरे यांनी जिल्हा अध्यक्षांसह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्ष कार्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!