यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : ढगफुटी सदृश्य पावसामुळे महागाव तालुक्यात शेती पिके खरडून गेली त्याच प्रमाणे अनेक गावांमध्ये पाणी घुसल्याने घरे,दुकाने पाण्याखाली आल्याने कधीही भरून न निघणारे प्रचंड मोठे नुकसान झाले असुन नुकसान ग्रस्त शेतकरी, नागरिक, व्यापारी यांना तत्काळ भरीव आर्थिक मदत देण्यात यावी तसेच तालुक्यातील नदी नाल्यांवर असलेल्या कमी उंचीच्या पुलांची उंची व रुंदी वाढविण्यात यावी,वाहून गेलेले पुल,खरडून गेलेल्या रस्त्यांची दुरुस्ती कामे तत्काळ करण्यात यावी व नदी, नाल्यांच्या पुरामुळे गावात पाणी घुसल्याने घरांचे नुकसान झाले आहे त्या पुर बाधीत क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी तत्काळ पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ता.महागाव यांच्या वतीने मा.एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण, मनसे शहराध्यक्ष संतोष जाधव, मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामारकर, मनविसे शहराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, मनसे उपतालुकाध्यक्ष शेरखान पठाण, देवेंद्र कदम, ओंकार राऊत, मनविसे तालुका उपाध्यक्ष अमर चव्हाण,मनसे विभाग अध्यक्ष विनोद खोंडे, श्रीकांत राऊत, सुनिल आव्हाड, जीवन मोरथकर, शाखाध्यक्ष मुकुंद जामकर, योगेश राऊत,अंगद कदम,अंकुश खाडे,माधव घोगेवाड, श्रीकांत नजरधने, अविनाश डाखोरे,उमेश डोळस, कृष्णा जाधव यांच्यासह मनसे, मनविसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Leave a reply