नायगाव प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : भारतीय जनता पार्टीचे नूतन नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष डाॅ.संतुकराव हंबर्डे यांचा जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी भव्य दिव्य असा सत्कार केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष धनराज शिरोळे हे उपस्थित होते. भाजपाचे नुतन जिल्हाध्यक्ष डाॅ. संतुकराव हंबर्डे हे देगलूर, मुखेड तालुक्यातील अतिवृष्टीची पाहणी करून नरसी येथून जात असताना नरसी येथील जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गंगाधर पाटील डोंगरगावकर ,विश्वंभर लोहगावे, गोविंदराव तुप्पेकर, नारायण कोसंबे डोणगावकर, ग्राम पंचायत सदस्य संभाजी मिसे,राजु सुर्यवंशी, जेष्ठ पत्रकार मनोहर तेलंग, सुभाष पेरकेवार, गोविंद टोकलवाड, गंगाधर गंगासागरे, मारोती सुर्यवंशी, रामप्रसाद चनावार, देवीदास सुर्यवंशी, सय्यद अजीम, धम्मदिप भेदेकर, परमेश्वर काडांळकर, मोरे, विश्वनाथ बडुरे,साईनाथ तळणे, जबार करखेलीकर, शिवाजीराव कु-हाडे,रमाकांत सुर्यवंशी, यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सह गावातील नागरिक उपस्थित होते.
Leave a reply