राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : केंद्रामध्ये सामाजिक न्यायमंत्री मा.ना. रामदासजी आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची युती भाजपा सोबत असल्याने, भाजपा व रिपाइं हे मित्रपक्ष आहेत. आम्ही आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थानिक व जिल्हा पातळीवर भाजपासोबत काम करीत असतो, असे असताना भाजपाचे मा. आमदार, खासदार हे रिपाई पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता फक्त त्यांचा वापर करून घेतात. आम्हाला डावलून विविध शासकीय समित्यांवर नुकत्याच निवडी करण्यात आल्या. त्या निवडीत रिपाइंच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याची, कार्यकर्त्याची निवड न केल्याने कार्यकर्त्यांत तीव्र संताप निर्माण झाला आहे.
केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखाली पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर शासकीय समित्यामध्ये डावल्याने कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळांने पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. निवेदनाच्या प्रति पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पाठविण्यात आल्या आहेत.
Leave a reply