Disha Shakti

सामाजिक

कारगिल विजय दिनानिमित्त अमर हुतात्म्यांचे स्मरण

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे :नादगांव (नाशिक) : भारत देशाच्या इतिहासात महत्वाची ऐतिहासिक घटना घडली १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू झाले भारतीय लष्कराने आपले युद्ध कौशल्य दाखवत २६ जुलै १९९९ ला कारगिल युद्धावर विजय मिळवला परंतु युद्ध काळात अनेक भारतीय जवानांना भारत मातेच्या रक्षणासाठी लढताना वीरगती प्राप्त झाली. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले याप्रमाणे हुतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांचे स्मरण करण्यासाठी व २६ जुलै कारगिल विजय दिनानिमित्त नांदगाव तालुक्यातील हुतात्मे चौकात २६ जुलै २०२३ रोजी माजी सैनिक कल्याण सेवाभावी संस्था, शिव संस्कार संस्था यांचे कडून कार्यक्रम संयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदगाव तालुका तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी , माजी सैनिक यांचे हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले. दरम्यान नानासाहेब काकळीज यांनी युद्धप्रसंगाच्या आठवणींना उजाळा दिला. मेजर जगन्नाथ साळुंखे यांनी शहीद जवानांना अभिवादन करत हुतात्मा स्मारक निर्मिती बाबत सांगितले.शिव संस्कार संस्थेचे सुमित गुप्ता यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी

सैनिक कल्याण संस्थेची कार्याध्यक्ष संजय खैरनार, हवालदार शंकर थेटे, सुमित गुप्ता, प्रा. सुरेश नारायणे, सुभेदार बाजीराव मोहिते, दैनिक आवाज संपादक भगवान सोनवणे, पत्रकार अनिल धामणे, बापू जाधव, मुस्ताक शेख, खंडु कोळेकर, प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे प्रभारी आरोग्य अधिकारी राहुल कुटे, मेजर जगन्नाथ साळुंखे, रामभाऊ पारख, कपिल तेलुरे, शिवाजी गरुड , गंगाधर औशीकर, विजय बोरसे, शिवाजी निकम,_अनंत शेवरे, नानासाहेब काकळीज, योगेश जाधव, मनोज शर्मा, मधुकर पवार ,प्रभाकर पगारे, भाऊराव जाधव, संदीप बोरसे, किसन जगधने, विनोद अहिरे, आकाश पानकर, वामन पोतदार, नेता निवे, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, व्यापारी, शहरातील विविध राजकीय पक्षाचे पक्ष पदाधिकारी सामाजिक संघटना संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी हुतात्मा स्मारकास पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. राष्ट्रगीत संपन्न करत भारत मातेच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!