राहुरी तालुका प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची तड लागावी, यासाठी नगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनतर्फे नुकतेच जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून निघाला.या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा मदिना शेख, सरचिटणीस राजेंद्र बावके, जीवन सुरुडे, शोभा लांडगे, मंदा कसारा, माया जाजू आदी उपस्थित हाेते.
प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे, यासाठी युनियनर्फे अनेकदा विनंत्या, अर्ज करण्यात आले. मात्र, अद्यापही सरकारकडून दाद देण्यात आली नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दरमहा पेन्शन, ग्रॅच्युईटी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, सेवानिवृत्तीनंतरचे थकीत एक रक्कम लाभ तातडीने देणे, आदी मागण्या करण्यात आल्या.
Leave a reply