बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी नघाना पुर आल्याने गावात पाणी शिरले. शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. चोवीस तासापासून अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी साचले आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले असून गुडघ्या इतके पाणी शेतात साचल्याचे चित्र बघालया मिळते. नदी काटचा शेतकऱ्यांवर आसमानी संकटाचा सामना करावा लागत आहे.
पिका सोबत घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी घरे पडलेली दृश्य पण पाहायला मिळाले अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी साचले आहे. नदी नाले ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले आहे. त्यामुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटला असून जनजिवन विस्कळीत झाले. रस्त्यावरून पाणी धावत आहे.
या वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याने सगळीकडे जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते काही गावांना वीजपुरवठा खंडित झाला होता त्यामुळे अनेक गावाना रात्र जागून काढावे लागले. शेतीचे घरांचे अतोनात नुकसान झाले आहॆ.ढगफुटी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दि.28 रोजी जिल्हा प्रशासनाकडून शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शेतीचे त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Leave a reply