संगमनेर प्रतिनिधी / शेख युनूस : संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक मंडळाचे विरभद्र व उच्च माध्यमिक हे शैक्षणिक दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या विद्यालयापैकी असून महत्वाचे मानले जाते. सध्या सुरु असलेल्या काही घटना ह्या मोबाईल च्या अति वापराने आणि विसंगती ह्या आदी गोष्टी लक्षात घेता विरभद्र विद्यालयात पालक मेळावा घेण्यात आला या मध्ये मोबाईल हा विद्यार्थी व शिक्षक यांनी शालेय वेळेत वापरू नये. शालेय कामाव्यतिरिकत कोणालाही शाळेत व शालेय आवारात येऊ देऊ नये. टारगेट मुलांना शालेय आवारात आणि शालेय बाह्य परिसरात कोणालाही प्रवेश देऊ नये.
विरभद्र विद्यालयात शिक्षक आणि पालक विद्यार्थी यांचा समन्वय साधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालक मेळाव्यात मोबाईल वापरावर सखोल चर्चा करण्यात आली व त्याच बरोबर शिक्षण विषयावर देखील उपस्थिताची मते जाणून घेण्यात आली. पालकांच्या सूचनेनुसार विद्यालयात विद्यार्थी व शिक्षक यांना शाळेच्या वेळेत मोबाईल वापरू नये, कामाच्या व्यतिरिक्त व टारग टाना शाळेच्या आवारात येऊ देऊ नये. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यवसाय मार्गदर्शन, शारीरिक शिक्षण पी टी योगा आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थिती मुख्याध्यापक बी. एस. खेमनर, यांनी पालकांच्या सुचनेनुसार तातडीने निर्णय घेऊन यापुढे शाळेच्या वेळेत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना आता मोबाईल वापरता येणार नाही, असा आदेश जारी केला.
Leave a reply