Disha Shakti

Uncategorized

माळकुप येथील कापरी नदीपात्रात अतिक्रमण; प्रवाहच बदलवला.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बन्सी घंगाळे यांचा उपोषणाचा इशारा

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / पोकळे गंगासागर : गोरेगाव-भाळवणी भागातील माळकुप काळकूप परिसरातील महत्त्वाचा जलप्रवाह म्हणून समजला जाणाऱ्या कापरी नदीवर पात्रामध्ये अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांनी नदीपात्राचा प्रवाहच बदलवला आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी आवाज उठवला असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बन्सी घंगाळे यांनी यासंदर्भात न्यायालयात न्याय मागितला आहे.

स्थानिक प्रशासन कडून त्यांची कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नाही. अतिक्रमण झाल्यामुळे कापरी नदीचे पात्र पूर्णतः अडवले गेले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. अतिक्रमण करणारे हे मुजोरपणा करत असून यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली आहे. ज्येष्ठ नेते बन्सी घंगाळे यांनी या नदीपात्रातील अतिक्रमणासंदर्भात प्रशासनाला निवेदन देऊन उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. घंगाळे यांचे वय ९० पेक्षा जास्त असून त्यांनी उपोषण केल्यास कुठेतरी वृद्ध सामाजिक कार्यकर्त्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे का ?

घंगाळे यांनी निवेदन दिले त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की माळकुप काळकुप नदीपात्राच्या कडेने २ एकर जमीनी व ३ विहिरी पाडण्यास परवानगी कोणी दिली कशी दिली गहान दिली की कराराने दिली याची माहिती वरीष्ठामार्फत करण्यात यावी हि विनंती कारण ही नदीपात्रातील जमीन हि महाराष्ट्र शासनाची किंवा महसुल शाखेची आहे. सर्कल तलाठी त्यांच्या विभागामधील असणाऱ्या सरकारी जमीनीचे देखभाल त्यांनी करावयाची असते कोणी अतिक्रमण केले. तर त्यावर कारवाई करायची असते परंतु आता तहसिलदार आणि सर्कल व तलाठी यांनीच काय गडबड केली हे सांगता येत नाही. काळकूप माळकूप चे तलाठी भाळवणीचे सर्कल, तहसिलदार, या चौघानी शेतकऱ्यांशी संगमत करुन ही जमीन महाराष्ट्र शासनाची असुन शेतकऱ्यांच्या ताब्यात पिढीजात दिलेली आहे. की काय? याची चौकशी करण्यात यावी.

मी एक सामाजिक कार्यकरता आहे. माझ्या जे निदर्शनास आले ते आपणाला कळवीत आहे. अर्जातील दोन तहसिलदार व तलाठी सर्कल या चौघांना जबाबदार धरुन मागास्वर्गीयांच्या जमीनीत पाणी सोडलेल्याची नुकसान भरपाई देण्यात यावी व वरीष्ठा मार्फत चौकशी करण्यात यावी म्हणुन मी पत्रकार परीषद घेत आहे व आमरण उपोषणाला जिल्हा अधिकारी कार्यालया समोर बसणार आहे. शेताला कुंपण केले पण कुंपणानेच शेत खावुन टाकल. अशातला हा प्रकार आहे. असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते घंगाळे हे म्हणाले यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बन्सी घंगाळे यांच्या समवेत माळकूपचे सरपंच संजय काळे, उपसरपंच राहुल घंगाळे, ग्रामपंचायत सदस्य अतुल पवार, दादासाहेब पंडित, देविदास गजरे, भाऊसाहेब येवले, सदाशिव शिंदे सर, रंगनाथ गांगुर्डे, राजेंद्र आंबेडकर, प्रकाश पंडित, मच्छिंद्र गांगुर्डे, नवनाथ गांगुर्डे आदी माळकूप येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

नदीपात्रातील अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित…

२०१९ ते २० पासून हा माळकुप येथील कापरी नदीपात्रातील अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित आहे वय वर्ष ९० असलेले सामाजिक कार्यकर्ते बन्सी घंगाळे हे या प्रश्नावर आवाज उठवत आहेत आज आंदोलन व उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे तरी प्रशासन दखल घेत नसेल तर गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग कधी येणार ?


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!