राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी पोलीस ठाण्यात ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक सज्जन किसन ना-हेडा यांच्यावर विवाहितेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक नार्हेडा फरार झाला आहे.
पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सज्जन किसन नार्हेडा हे राहुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने तेथील अधिकाऱ्यांकडे जर तपास असेल तर तेथील तपासी अधिकारी नि:पक्षपणे तपास करणार नाही. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अथवा तपासी अधिकारी त्यांच्या माजी सहकाऱ्याला वाचविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेथील राहुरीचे पोलीस तपास अधिकारी पिडीतेवर दबाब आणून तपासात नाहक पळवाट सोडू शकतात.
या प्रकरणाचा तपास खमक्या अधिकाऱ्यांकडे देऊन एका महिलेवर झालेल्या अत्याचाराला आपणांकडूनच न्याय देण्यात येईल. कारण आरोपी सज्जन किसन नार्हेडा यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. म्हणून राहुरी पोलीस ठाण्याबाहेरील त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात यावा, अन्यथा आपणांस पूर्व सुचना देऊन मंत्रालया समोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राहुरी तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी दिला आहे
विवाहितेवर बलात्कार प्रकरणातील आरोपी सज्जन ना-हेडा यांचा तपास त्रयस्थ अधिकाऱ्याकडे देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

0Share
Leave a reply