अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : राहूरी तालुक्यातील उंबरे येथील दोन गटाच्या वादाच्या पार्शवभूमीवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले म्हणाले की, कोणालाही जाती धर्माचा आमचा विरोध नाही. जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी शालेय मुलींबाबत गंभीर प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे मुलींविषयी गांभीर्याने लक्ष घालून टार्गेट तरुणांचा बंदोबस्त करावा. मुलींची छेडछाड करणारे दुसऱ्या गटाच्या आरोपीना अटक न केल्यास त्यांचा बंदोबस्त आम्ही आमच्या पद्धतीने करू त्यामुळे पोलिसांनी या कडे गांभीर्याने लक्ष घालावे.
मुलींची छेडछाड करणाऱ्या आरोपीना अटक न केल्यास आम्ही त्यांचा बंदोबस्त आमच्या नियमानुसार करू यासाठी न्यायालय प्रकरणी संपूर्ण खर्च आम्ही करू वकील, कोर्ट आम्ही पाहतो यात आमचा चांगला अभ्यास झाला आहे. न्याय हक्कासाठी आपण नेहमी कर्तव्याने पुढे आहोत. उंबरे येथील सर्वानी मिळून मिसळून एकत्रित येत गावाने संघटित होऊन अशा प्रकारविरोधात एकी ठेवणे गरजेचे आहे, असे माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी शिवाजीराव कर्डीले म्हणाले की, कोणालाही जाती धर्माचा विरोध नाही परंतु अपप्रवतीला आमचा विरोध आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करू नये बंधू प्रमाणे राहावे एका आईचे लेकरं होऊन राहावे. पालकांना मुलींच्या सुरक्षेची भीती वाटत असून अब्रू जाईल या भीतीने कोणी पुढे येत नाही त्याचा गैरफायदा जात असेल तर त्याचा बंदोबस्त आम्ही करू. कोणी आपले घर सोडू नका, गांव सोडू नका जर पोलीस अटक करण्यास आले तर मला कळवा. तरुणांनी कायदा हातात न घेता शांत राहण्याचे आव्हान केले.
अटक व्यक्तींना त्वरित जामीन दया, लवकर जामीन न मिळाल्यास आमची अटक होण्याची तयारी आहे. तुमच्या कडील यादीतील लोकांना हात लावू नका असे माजी मंत्री व जिल्हा बँक अध्यक्ष पै. शिवाजीराव कर्डीले यांनी पोलिसांना सांगितले. राजकारण म्हणून ही बैठक नसून हिंदुत्ववादी साठी आपण खंबीर उभे आहोत. याबाबत पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करून जिल्ह्यात अशा घटना घडू नये त्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
उंबरे येथील घटनेची माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी विधान परिषद सदस्य व आमदार प्रसाद लाड यांना दिल्यावर आमदार प्रसाद लाड यांनी विधानसभेवर उंबरे येथील प्रश्न उपस्थित केला असता उपसभापती निलम गोऱ्हे यांनी याबाबत सरकारला या प्रकारणी उच्च स्तरीय यंत्रनेकडून तपास करण्याच्या सूचना केल्या. यावेळी सीताराम ढोकणे, आदिनाथ महाराज,ज्ञानदेव क्षीरसागर, ज्ञानेश्वर ढोकणे, पत्रकार दत्तात्रय तरवडे, माजी सरपंच संतोष ढोकणे,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. राहूरी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे, यांनी शांततेचे आव्हान केले आहॆ.
उंबरे प्रकरण गांभीर्याने घ्यावे अन्यथा आम्ही दखल घेऊ माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचा इशारा

0Share
Leave a reply