Disha Shakti

इतर

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे मणिपूर घटनेचा निषेध

Spread the love

प्रतिनिधी / युनूस शेख  :  मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारचा निषेध करून आरोपीना कठोर शासन करावे अशी मागणी राहूरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे करण्यात आली. मणिपूरमध्ये 80 दिवसापूर्वी महिलांवार आत्याचार करण्यात आला असून ही घटना देशासाठी व सर्वासाठी निंदनीय आहे. मणिपूर येथील घटनेमुळे दोन्ही सरकारांचा निषेध करत, महिलांवरील अत्याचार बंद व्हावेत आरोपीना कठोर शिक्षा व्हावी, मणिपूर राज्यात शांतता निर्माण करावी असे निवेदन राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे राहूरी येथील तहसीलदार पूनम दांडिले व सचिन औटी यांना डॉ. उषाताई तनपुरे, शारदा खुळे, अपर्णा ढमाळ आणि इतर महिला यांनी निवेदन दिले.

यावेळी राहूरी तालुकाध्यक्ष शारदा खुळे, अपर्णा ढमाळ, वृषाली तनपुरे, उषा कोहकडे, कविता जेजुरकर, नंदा उंडे, स्वाती शिंदे, सरिता निमसे, प्राजक्ता देवकर, वैशाली तनपुरे, जयश्री मोटे, मीना पाटिल, मंगल गायकवाड, अश्विनी कोहकडे, विमल तमनर, शीतल भिंगारदे, राजश्री घाडगे आदी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!