Disha Shakti

Uncategorized

जिल्हा. प. कर्मचारी सोसायटी अध्यक्षपदी अरुण जोर्वेकर तर उपाध्यक्ष पदी डॉ.चंद्रकांत संसारे

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अरुण जोर्वेकर आणि उपाध्यक्षपदी डॉ.चंद्रकांत संसारे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अभ्यासो अधिकारी किरण आव्हाड यांच्या अध्यक्षखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली असून नूतन पदाधिकारी यांचे सभासदांमधून स्वागत आणि सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी अध्यक्षपदी अरुण जोर्वेकर यांच्या नावाची सूचना संचालक कैलास डावरे यांनी केली असता सदरील सुचनेला राजू दिघे यांनी अनुमोदन दिले.

योगेंद्र पालवे यांनी उपाध्यक्ष पदासाठी डॉ. चंद्रकांत संसारे यांच्या नावाची सूचना मांडली असता ऋषिकेश बनकर यांनी अनुमोदन दिले. या प्रसंगी नूतन अध्यक्ष अरुण जोर्वेकर म्हणाले की, सोसायटी संचालक मंडळाने सभासदांना दिलेल्या सर्व सभासदांनी पूर्तता केली. भविष्यात संस्थेमार्फत कमीतकमी व्याज दरात सभासदांना कर्ज वाटप करण्याचा मानस असून संस्थेचे आर्थिक हित व सभासदांचे हित हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सहकारी संचालक व सभासदांच्या सहकाऱ्याने विविध योजना राबविण्यात येतील.

यावेळी उपस्थित मावळते अध्यक्ष संजय कडूस, संचालक प्रशांत मोरे, विक्रम ससे,विलास शेळके, भाऊसाहेब चांदणे, डॉ. दिलीप डांगे, स्वप्नील शिंदे, श्रीमती ज्योती पवार, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देसमाने, काशिनाथ नरोडे, अर्जुन मंडलिक,सुरेखा महारानूर, मनीषा साळवे, संतोष भैलुमे,योगेश पंडूरे, सभासद नितीन निर्मळ, हरी शेळके, व्यवस्थापक राजेंद्र पवार, उप व्यवस्थापक प्रशांत लोखंडे आणि कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!