यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : कोसधनी पोलीस मदत केंद्र उमरखेड येथे कार्यरत असलेल्या व कर्तव्यावर असतानाच शनिवार दि.२९ च्या रात्री दरम्यान भर रस्त्यातच बंद पडलेले वाहन पाहण्यासाठी पोलीस व्हॅन घेऊन गेली असता व त्या वाहनधारकांची विचारपूस करत असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर वाहान क्रं एम एच १२ टिसी-डिएक्सझेड -७६०
चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून पोलीस व्हॅनला जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की पोलीस वाहनाचा पूर्णतः चुराडा झाला कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी संजय रंगराव नेटके वय वर्ष ४१ व आयशर वाहन चालक पांडुरंग हरी नकोते वय वर्ष ५० हे दोन्ही वाहनाच्या मध्ये दबून मरण पावले तर संतोष हराळ व कुणाल साळवे हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ व नागपूर येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याआपघातात ठार झालेले पोलीस कर्मचारी संजय नेटके पुसद येथील असून त्यांच्या या दुर्दैवी अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कोसदनी पोलीस चौकी येथे कार्यरत असणारे सुभाष नागदिवे यांनी आर्णी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून अधिक तपास आर्णी पोलीस ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.
आयशर टँम्पोच्या धडकेत पोलिस व्हॅनचा चुराडा : एक पोलीस कर्मचारी जागीच ठार तर दोन पोलीस कर्मचाऱी गंभीर जखमी

0Share
Leave a reply