अ.नगर प्रतिनिधी / वसंत रांधवन : अहमदनगर शहरात गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणजेच पीएसआय म्हणून नियुक्ती असल्याचे सांगत विविध पोलिस ठाण्यांमध्ये राबता ठेवणार्या एका महाठगाला गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस अधिकारी असल्याचे भासवत त्याने लग्न जमवले आणि लग्नही केले. तीन वर्षांपासून नगरच्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये हजेरी देणारा आणि अधिकारी- कर्मचार्यांमध्ये उठबस देणार्या या भामट्याबद्दल कोणालाच शंका आली नाही. मात्र, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना सदरची माहिती मिळताच त्यांनी या बोगस अधिकार्याचा पर्दाफास केला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला आणि अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की नगर शहरात एक तोतया पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश घालून वावरत आहे. सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर नगर शहरातील सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील वस्तीत हा तोतया राहत असल्याचे पोलीस पथकास आढळले.
Leave a reply