Disha Shakti

कृषी विषयी

नवनियुक्त जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांची अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनीच्या सीड प्लॉटला विशेष भेट

Spread the love

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यातील आज बेळकोणी बू येथे अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनीस नांदेड जिल्ह्याचे जिल्हा कृषि अधिक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी विशेष भेट दिली त्यावेळी त्यांच्या समवेत श्री जे डी पवार साहेब (तालुका कृषि अधिकारी बिलोली), सौ मुत्तेपोड मॅडम (कृषि सहायक बेळकोणी बू) श्री एस जी कांबळे (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कृषि विभाग बिलोली) आणि गावाचे सरपंच प्रतिनिधी आणि गावातील शेतकरी उपस्थित होते.

या भेटी दरम्यान अमृतालयम चा संपूर्ण प्रवास जाणून घेतला. बेड आणि बी बी एफ वर लागवड केलेल्या सोयाबीन सीड प्लॉटची पाहणी केली. सोयाबीन पीक संरक्षण सह शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती दिली.सोयाबीन बिजोउत्पादनात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्धल अमृतालयमचा गौरव करण्यात आला आणि सबंध नांदेड जिल्ह्यात बिजोउत्पादनाची चळवळ उभी करण्यासाठी अमृतालयम कडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात यावेत त्या साठी कृषि विभाग आपल्या सोबत असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

रिलायन्स फाऊंडेशन आणि संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या मार्गदर्शनातून सोयाबीन बियाण्यांच्या बाबतीत गावाला स्वयंपूर्ण केल्या बद्धल अमृतालयम कडून जिल्हा कृषि अधिक्षक यांना एका रिपोर्ट्स द्वारे कळविण्यात आले.कृषि विभाग नांदेड यांच्या माध्यमातून बेळकोणी (बू) गावाला आदर्श गाव बनविण्यासाठी तालुका कृषि विभाग यांच्या कडे प्रस्ताव देण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कडून सूचना देण्यात आलेल्या आहेत.

अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड कडून विशेष वेळ काढून भेट दिली त्या बद्दल जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे सरपंच व ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!