Disha Shakti

राजकीय

राहुरी शहरात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी शहर शिवसेनेच्या वतीने आज दिनांक 30/07/2023 रोजी राहुरी शहराची आढावा बैठक असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये व खेळीमेळी याच्या वातावरणात तनपुरे वाडी सांगळे वस्ती मातोश्री भवन येथे संपन्न झाली.

बैठकीचे अध्यक्षस्थानी शिवसेना नगर दक्षिण जिल्हाप्रमुख बाबू शेठ टायरवाले हे होते/ त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाप्रमुख अण्णा पाटील म्हसे आध्यात्मिक सेनेचे जिल्हाप्रमुख संपत काका जाधव जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्याम भाऊ गोसावी उपतालुकाप्रमुख शिर्डी मतदार संघ 32 गाव प्रमुख प्रभाकर तुपे राहुरी तालुकाप्रमुख देवा लांबे हे होते आढाव बैठकीचे महत्त्वाचा विषय राहुरी शहरातील शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती व राहुरी शहरातील शिवसेना अंगीकृत संघटना शिवसेना राहुरी शहर युवा सेना व शिवसेना महिला आघाडी शहर शाखा आणि राहुरी शहर शिवसेना माजी सैनिक शाखा वरील संघटनेच्या व शिवसेनेच्या राहुरी शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या राहुरी शहर प्रमुख गंगाधर सांगळे व जिल्हाप्रमुख बाबू शेठ टायरवाले स्वाक्षरीने पदाधिकारी नियुक्त पत्र देऊन त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच आढाव बैठकीस उपस्थित राहिलेले जिल्हाप्रमुख व इतर मान्यवरांचा राहुरी शहर गंगाधर सांगळे पाटील यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला त्याचबरोबर जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले उपजिल्हाप्रमुख अण्णा पाटील म्हसे आध्यात्मिक सेनेचे जिल्हाप्रमुख संपत काका जाधव प्रसिद्धी प्रमुख श्याम भाऊ गोसावी व अनेक काही मान्यवरांची शिवसैनिकांना महिला आघाडी कार्यकर्त्यांना युवा सेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर भाषणे झाली.

कार्यक्रमाच्या शेवटी गंगाधर सांगळे यांनी सर्व मान्यवरांचे व शिवसैनिक व महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक यांचे सर्वांचे आभार व्यक्त केले त्यानंतर सर्व मान्यवरांनी व शिवसैनिकांनी पदाधिकारी व महिला आघाडी शिवसैनिक पदाधिकारी यांनी सर्वांनी मिळून अल्पोपहार स्वाद घेतला त्यानंतर कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली आणि नंतर मान्यवरां चा निरोप समारंभ करण्यात आला.

शिवसेना राहुरी शहर व शिवसेना अंगीकृत संघटना नूतन पदाधिकारी यादी राहुरी शहर उपप्रमुख हरिचंद्र बाजीराव पवार सूर्यकांत वसंतराव डावकर भाऊसाहेब नानासाहेब मेहेत्रे भानुदास फकीरा जाधव आणि शहर संघटक गोरक्षनाथ भागोजी सिन्नरकर दुर्गेश सुकलाल वाघ शेअर सचिव बाळकृष्ण गीताराम येवले प्रसिद्धी प्रमुख अजित बाबू इनामदार आणि शहर विभाग प्रमुख राजेश कुमार भागवत संतोष त्रिंबक सरोदे विकास काशीद विकास शामराव साळवे युवा सेना पदाधिकारी आशुतोष अरुण शिंदे वैभव राजेश भागवत ओंकार सुनील वाघुर वाघ प्रथमे किशोर वाहुर वाघ राहुल राजू आव्हाड गौरव सुनील वाहूर वाघ युवा सेना पदाधिकारी पदी निवड करण्यात आली शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी राहुरी शहर सौ अनिता भानुदास जाधव सुवर्णा गणेश खांडवे सौ.वैशाली विकास काशीद सौ वैशाली साईप्रसाद जोगदंड त्याचबरोबर राहुरी शहर शिवसेना माजी सैनिक पदाधिकारी येवले बाळकृष्ण गीताराम सुखदेव हारदे दत्तू नामदेव पाटोळे जालिंदर गजा राम वरील पदाधिकारी लोकांची निवड करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!