Disha Shakti

क्राईम

यवत पोलिसांनी केले परप्रांतीय युवकाच्या खुन्याला अटक…

Spread the love

दौंड प्रतिनिधी किरण थोरात  : दिनांक २४/०७/२०२३ राहु गावच्या हद्दी मध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार हत्याराने वार करून मयत भिमकुमार अनिल यादव वय ३० वर्ष राहणार जयपूर, राज्य बिहार याचा खुन करून मृतदेह राहु येथील शेतकरी महादेव तुकाराम शिनगारे यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये फेकून दिल्याचे आढळून आले होते.सदर मयत इसम भिमकुमार अनिल यादव हा विजय / रामराव शहाजी सोनवणे यांच्या म्हशीच्या गोठ्यावरती कामगार म्हणून काम करत होता.

सदर खुनाच्या घटनेचा गांभीर्याने विचार करत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळमकर, यवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यवत गुन्हे शोध पथकाची वेगवेगळी तीन तपास पथके तयार करून त्या अनुषंगाने तपास केला असता गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपास केला असता.

यवत गुन्हे पथकाला बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सोनवणे यांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम करणारा कामगार भोला उर्फ जयप्रकाश जंगलाप्रसाद कुमार (आराहारा-वाराणसी- उत्तर प्रदेश) यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने मयत भिम कुमार यादव याचा खून केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीला प्रथम दंडाधिकारी न्यायालय दौंड यांनी चार दिवस पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोसई मदने करीत आहेत.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे बारामती, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अविनाश शेळमकर, यवत पोलीस प्रशांत मदने स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा, पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोसई मदने, पो.हा. निलेश कदम,पो,हवा.गुरुनाथ गायकवाड,पोलिस हवा अक्षय स्थानिक गुन्हे पो,हवा,सचिन घाडगे, पो.हवा.अजित भुजबळ, पो, हवा, रामदास जगताप, पो,हवा. चांदणे, पो.ना.अजित काळे, पो,ना.अमित शाखा यादव,पो, कॉ. मारूती बाराते यांच्या पथकाने केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!