दिशा शक्ती : निवृत्ती शिंदे / दि.३१, मालेगाव (नासिक) : मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे पाडे शिवारात रितेश राजे पेट्रोल पंपाच्या पुढे मालेगाव मनमाड रोडवर दि.२२/०७/२०२३ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अनोळखी पुरुष मयत अवस्थेत आढळून आला त्यास मालेगाव येथे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी डॉक्टरांनी मयत घोषित केले. मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात सीआरपीसी १७४,नोंद क्रमांक ७६/२०२३ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील, मालेगाव तालुका पोलीस ठाणे, करत आहेत.
अनोखी मयताचे वर्णन: पुरुष अंदाजे वय ३०ते ३५वर्ष ,उंची १६७ सेमी, सडपातळ बांधा, सावळ्या रंगाचा, डोक्यावर काळ्या रंगाचे मध्यम केस, दाढी वाढलेली ,अंगात फुल बाहीचा काळ्या- लाल रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची पुढच्या बाजूला तीन-चार खिसे असलेली फुल पॅन्ट, कमरेस तपकिरी रंगाचा पट्टा, तसेच गळ्यावर डाव्या बाजूला तीन पंचकृती चांदणे गोंदलेले आहे. उजव्या हातावर इंग्रजीत “SANJEEV” असे गोंदलेले आहे.
डाव्या हाताच्या पंजावर “ऊ” असे गोंदलेले आहेत अशा वर्णनाच्या -व्यक्तीच्या वर्णनाबाबत कोणासही काहीही माहिती असल्यास, ओळखत असल्यास , संबंधित नातेवाईकांनी तपास अधिकारी मालेगाव तालुका पोलीस ठाणे०२५५४- २२२०३३/ ९४२०६२४८०८ किंवा पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील ९८२३३१४८१९ यांच्याशी संपर्क साधावा.
Leave a reply