Disha Shakti

Uncategorized

चेक न वटल्याने आरोपीस सहा महिने सश्रम कारावास व पंचवीस लाख रुपये दंडाची शिक्षा..

Spread the love

दौंड प्रतिनिधी किरण थोरात

दौंड : केडगाव येथील तत्कालीन अमोल पॅकेज ड्रिंकींग वॉटर कंपनी चे भागीदाराला Negotiable Instrument Act (NI act) चे कलम 138 नुसार सहा महिने सश्रम कारावास व पंचवीस लाख रुपये चा दंड दौंड न्यायालयाने ठोठावला.
हाती आलेल्या माहिती नुसार केडगाव येथील तत्कालीन अमोल पॅकेज ड्रिंकिंग वॉटर कंपनीचे भागीदार श्री. विकास बाळासाहेब गायकवाड याने दिलेला चेक न वटल्याने फिर्यादी ने दौंड न्यायालयात खटला दाखल केला होता,सदर खटल्या चा निकाल ता. 31/7/2023 रोजी झाला असून दौंड येथील मे प्रथम वर्ग न्यायाधिश श्रीमती जे.एस.खेडकर – गोयल कोर्टा ने फिर्यादी तर्फे अँड. आर. के. भिसे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीने दिलेला चेक न वटल्याने आरोपीला सहा महिने सश्रम करावसाची व पंचवीस लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सदर खटल्याचे कामकाज फिर्यादी तर्फे अँड.आर. के. भिसे व सहकारी अँड.मोनिका जगताप यांनी पाहिले .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!