बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : नांदेडचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता, अवाजवी खर्च न करता आपल्या नेत्याचा वाढदिवस समाजिक उपक्रमातून व्हा या उद्दात हेतूने अनुसूचित जमातीचे भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र तोटावाड रेड्डी यांनी जि.प.शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवसा निमित्त मौजे जिगळा, लोहगांव, तळणी, पाचपिपंळी व रामपुर मजरा येथील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस प्रमुख अतिथी लक्ष्मण ठक्करवाड जिल्हा सरचिटणीस तथा मा.जि.प.सदस्य, श्रावण पाटील भिलवंडे जिल्हा सरचिटणीस, माणिकराव लोहगांवे, मा.जि.प.सदस्य, चंद्रशेखर पाटील सावळीकर, शंकरराव परसूरे उपसभापती पं. स. बिलोली, आबाराव संगनोड माजी उपसभापती मार्केट कमिटी बिलोली,शैलेश पाटील चिंचाळकर जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा, सौ.शिवकन्याताई सुरकूटलावार यांचा प्रमुख उपस्थिती शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी आयोजक राजेंद्र रेड्डी तोटावाड, बालाजी देशमुख, शिवाजी तुकडे, भगवान पाटील कानोले, संदीप पाटील रामपुरे, संजय पाटील रामपुरे, शंकरराव तोटावाड, प्रकाश पाटील वानोळे, अप्पाराव पा. मुस्तापुरे, स्वछतादूत भगवान पाटील हांडे, शिवराज पा. बुड्डे, शंकर येरमवार, लक्ष्मण मुरशेटवाड, विठ्ठल गायकवाड,विलास नाईनवाड, मुख्याध्यापक कोंडावार, भीमराव मोंडेवाड, लक्ष्मीकांत बासेटवार,आनंद पा. कानोले, शेषेराव पाटील तळणी, गणेश पा. जिगळा, लक्ष्मण टोपाजी, पांचाळ, साईनाथ मुटनवाड, व्यंकट सुरकुटलावार, नागेश श्रीरामे, सुभाष श्रीरामे, पंकज रामपुरे, सुरेश मुरसेटवाड मु. अ., अनिल पिंपळे, लक्ष्मण माली पाटील, भाऊसाहेब बनबरे, मु.अ.पांचाळ यांच्यासह वरील शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते अनेकांची उपस्थिती होती.
खासदार चिखलीकर यांचा वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप, राजेंद्र तोटावाड यांचा उपक्रम

0Share
Leave a reply